स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडींग करण्यापुर्वी विचारात घेण्याजोग्या महत्वाच्या बाबी

Mon Jan 8, 2024

Safe Ways To Trade in The Stock Market

11Th क्लास मध्ये असतांना गणीत विषयात Logic (तर्कशास्त्र) नावाचा धडा होता, नव्वदीच्या दशकातील बहुतांश विद्यार्थी मित्रांना ही बाब नक्कीच आठवणीत असेल. तर्कशास्त्र धडा शिकवतांना शिक्षक एक रुपयाचे नाणे टॉस करून हेड किंवा टेल पडण्याची शक्यता (Probability) किती आहे, हे गणीती पध्दतीने सागजावून सांगायचे. नाण्यास दोनच बाजू असल्याने टॉस केल्यास हेड येण्याची शक्यता 50% असते तर टेल येण्याची शक्यता 50% असते, हे त्यावेळी बहुतांश विद्यार्थांना सहज कळले असेल. हा शक्यतेचा खेळ (Game of Probability) आपण आपल्या मित्रांबरोबर बऱ्याचदा खेळत असतो. 

अगदी या खेळासारखाच Stock Market हा Probability चा खेळ आहे. इथे Profit होण्याची Probability 50% तर Loss होण्याची Probability 50% आहे. असे असतांना आपले 50% ट्रेड Profit मध्ये का येत नाहीत? हा निरोत्तरीत वाटणारा प्रश्न बहुतांश ट्रेडला बऱ्याचदा पडला असेल. याच निरोत्तरीत वाटणाऱ्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आज आपण या ब्लॉगमधून करणार आहोत. या ब्लॉगमध्ये आपण Stock Market मध्ये ट्रेडींग करण्यासाठी काही सुरक्षीत मार्ग व ट्रेडींग करण्यापुर्वी विचारात घेण्याजोग्या महत्वाच्या बाबी अभ्यासणार आहोत. 

1. Volatility 

खालील image मध्ये PVR ची 3 मिनिटाची कॅण्डल दर्शवली आहे.. केवळ 3 मिनिटाच्या दोन कॅण्डल मध्ये (सहा मिनीटात) 1% ची move आली आहे. अशा Volatile स्टॉक मध्ये intraday करिता Technical Analysis ला खुप मर्यादा येतात. म्हणून Intraday करिता High Volatile स्टॉक मध्ये ट्रेड करणे टाळावे. आपण Volatile स्टॉकमध्ये Swing किंवा Positional ट्रेड घेऊ शकता. तथापि जास्त Volatile स्टॉक मध्ये जाखीम आणि परतावा दोन्ही अधीक असतात, ही बाब ध्यानात घेऊनच ट्रेड घ्यावा. लक्षात असू द्या.

High volatility is enemy for traders.

2. Liquidity 

 एखादा stock सहजतेने आपल्याला हव्या त्या price ला घेता येत असेल किंवा विकता येत असेल तर तो स्टॉक Liquid आहे असे म्हणता येईल. 

 उदा.ABC या stock ची current market price 100/- चालू आहे. तुम्हाला हा stock घ्यायचा आहे. पण LTP (Last traded Price) 100/- असूनही ज्याच्याकडून तुम्हाला stock घ्यायचा आहे तो मात्र 200/- ला स्टॉक घ्या म्हणत आहे. नाईलाजास्तव तुम्हाला तो स्टॉक 200/- ला घ्यावा लागला. आता हे घेतलेला स्टॉक तुम्हाला LTP 200/- चालू असताना विकायचा आहे. मात्र घेणारा Buyer 150/- ला मागत आहे. म्हणून नाईलाजाने हा स्टॉक तुम्हाला 150 ला विकावा लागेल. या ABC स्टॉक मध्ये प्रत्येक tick price ला Buyer/Seller असते तर तुम्हाला हव्या त्या price ला हा stock विकता किंवा घेता आला असता. 

प्रत्येक tick price ला buyer/seller असतील तर तो स्टॉक liquid आहे असे म्हणता येईल. दुसऱ्या भाषेत असेही म्हणता येईल की, एखाद्या स्टॉक चा bid-ask difference कमी असेल तर तो स्टॉक liquid असतो. वरील उदाहरणात ABC स्टॉक liquid नव्हता. आपण trade घेणाऱ्या stock ची liquidity तुम्हाला माहित असायला हवी. जेणे करून तुम्हाला प्रत्येक tick ला buyer/seller मिळेल. अन्यथा stock ट्रेडिंग न होताच ups/down स्लिप होईल. याने लॉसेसचा चान्स वाढतो. तुलनात्मक दृष्ठ्या Liquid स्टॉक मध्येच trade घ्या. Iliquid स्टॉक मध्ये trade घेऊ नये. जसे की IDEA. तुलनात्मक दृष्ट्रया IDEA मध्ये trade घेण्यापेक्षा BHARTIAIRTEL मध्ये trade घेतलेला कधीही योग्यच असेल.

Liquidity is a friend for a trader.


3. Relative Strength: Buying The Strongest And Selling The Weakest 

 "Buy on each deep and sell on each rise." जो trader अशी मानसिकता घेऊन trade घेतो तो वर्षाच्या सरतेशेवटी लॉसच घेऊन जातो. टीव्हीवाले असेच म्हणतात, This is best opportunity to buy on every deep. 

आता हा deep बऱ्याच वेळेस आपल्याला भेटतच नाही. Buy on deep करत करत Yes Bank, DLF, Suzlon ने लोकांची घरे उध्वस्त केली. आज जो Strength Buy करतो आणि Weakness Sell करतो तोच टिकतो. Technically स्टॉक महाग असू द्या, पण स्टॉक महागात घेऊन महाग विकण्याची तयारी ठेवा. 

Weak स्टॉक मध्ये deep buying किंवा Bottom Fishing ची मानसिकता सोडून द्या. Stock Market मध्ये ट्रेडींग करतांना एक गोष्ट मनात बिंबवून ठेवा.

“Buying the strongest and selling the weakest”. इथे Winning Probability वाढवायची असेल तर Strongest स्टॉक Buy करा आणि Weakest स्टॉक Sell करा.
4. Positive Thinking, Positive Attitude and Positive Approach 

 तुम्ही Technical Analysis कसे करता, मी Technical Analysis करतो पण मला लॉसच होत आहे, असे म्हणुन काल एकाचा कॉल आला. मित्रांनो, मार्केट मध्ये Price ही सापेक्ष (Relative) संकल्पना आहे. Price ट्रॅक करण्यासाठी तुम्हाला काहीतरी सापेक्ष ठेवावे लागेल. मग तुम्ही सपोर्ट, रजिस्टन्स सापेक्ष ठेवू शकता किंवा RSI, SMA सारखे Indicator ही सापेक्ष ठेवू शकता. 

या गोष्टी सापेक्ष ठेवल्यानंतर जर Bullish संकेत भेटले तर स्टॉक Buy करायचा आणि Bearish संकेत भेटले तर स्टॉक सेल करायचा. खूप सोप्प आहे Technical Analysis. इतकच काय तर तुम्ही डोळे झाकून Price वर एक अडवी लाईन मारा आणि ही लाईन सापेक्ष ठेवून ट्रेड घ्या. तुम्हाला Profit होणारच. अगदी 100% Profit होणार. मग इतक सोप्प आहे तर लोक Loss का करतात. 

इथे Winner आणि Looser मध्ये फक्त एक गोष्ट वेगळी असते positive thinking, positive attitude and positive approach. ज्याच्याकडे या तीन गोष्टी आहेत, तो मार्केट मध्ये पैसा कमवणारच. या गोष्टी क्षणात विकसीत होणार नाहीत, यावर तुम्हाला विशेष काम करावे लागेल. 

Fundamental Analysis आणि Technical Analysis तर कोणीही शिकेल, पण येथे गरज आहे ती Mental Analysis करण्याची. 

Mental Analysis करीता Mark Douglas चे Trading in the zone हे पुस्तक नक्की वाचा. या पुस्तकाची इंग्रजी प्रत आपल्या MarketMindsAcademy.in या साईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

मित्रांनो, “Stock Market मध्ये ट्रेडींग करण्यासाठी काही सुरक्षीत मार्ग” या सीरीज मध्ये आपण वरील महत्वाच्या चार बाबी अभ्यासल्या आहेत. आणखीन काही बीब आपण याच सिरीजच्या पुढल्या भागात अभ्यासणार आहोत. तोपर्यंत 

Best of Luck. Be Safe Trade.

Market Minds Academy
Learn With Market Minds Academy

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
Market Minds Academy 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy